About the Book: उगवत्या सुर्यासह नव्या सामर्थ्याने उगवावे आणि मावळत्या सुर्यासह जुने अनुभव रुजवावे अभ्यासाला अनेक पर्याय परंतु सर्वात संदर मार्ग हाती लागतो अनुभव अभ्यासल्याने. प्रत्येकाच्या आयुष्यात निम्म्याहुन अधिक प्रसंग सारखेच, मात्र त्याचे स्वरूप निराळे. आयुष्यातील साध्या-साध्या गोष्टीला दुर्लक्षित करुन, वेगळे काहीच्या नादात, साधसरळ आयुष्यातील वेगळच करून बसतो. दोरीला जेवढं गुंतवलं तेवढी ती गुंतत जाते आणि गुंतलेल्या दोरीचा उपयोग जरा कमीच. म्हणुन दोरीला म्हणजे आयुष्याला साध्या सरळ गोष्टीत गुंतवण्यापेक्षा, आहे तशी मोकळी ठेवली तर अधिक उपयोगाची आहे. हातातून वाळू जशी निसटत जाते तसंच आयुष्य बघता- बघता निघून चाललय आणि आपण आयुष्यच्या नको असलेल्या गुंत्यात गुंतुन बसलो... शोधत अशा प्रश्नांचे उत्तर, ज्यांचे उत्तर अनुभवाने आधीच दिलयं. समोर उपस्थित असलेला अंश-आणि अंश काही तरी सांगत असतो, प्रत्येक अनुभव नवे ते शिकवत असतो आणि आपण मात्र आपले इंद्रिय बंद करुन निष्फळ व्यथेत विलीन असतो. उगवत्या सुर्याची ओढ साऱ्यांनाच असते, खेरीज कधी 'अस्त' होत असलेल्या सुर्याकडे डोकावून बघा नक्कीच ती उगवत्या सुर्यापेक्षा प्रेरणादायी असेल. शेवटी काय ? तर ...... 'अस्त अनुभवावे, कारण..... अनुभव बोलतो'...
Bitte wählen Sie Ihr Anliegen aus.
Rechnungen
Retourenschein anfordern
Bestellstatus
Storno