About the Book: १९७४ साली वयाच्या चोविसाव्या वर्षी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या आयआयटी कानपूरच्या ध्येयवादी विद्यार्थ्याची ही कथा आहे. अमेरिकेतील अत्यंत लाभदायक जीवनक्षेत्र सोडून १९८१ मध्ये तो ग्रामीण भारतात काम करण्यासाठी परतला. सगळे सल्ले धुडकावून परत आलेल्या आणि त्या प्रक्रियेत स्वत ची ओळख पटलेल्या आदर्शवादी तरुणाची ही गोष्ट आहे. १९७० च्या दशकातल्या त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्य आणि अनुभवांच्या आठवणींबद्दल डॉ. अनिल राजवंशी यांनी आकर्षक आणि रंगतदार शैलीत लिहिलं आहे. ही एक प्रेरणादायी कहाणी आहे आणि सर्व भारतीयांना विशेषतः अनिवासी भारतीय आणि परदेशी जायला इच्छुक पण खास करून ग्रामीण भारतात बदल घडवून आणण्याची आस असलेल्यांना भावेल. हे पुस्तक प्रथम २००८ साली इंग्रजीत छापलं गेलं आणि त्याचा मराठी अनुवाद आता येत आहे. पुस्तकाची अग्रिम प्रत महाजालावर उपलब्ध करण्यात आली होती आणि जगभर त्याला अफाट सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
Hinweis: Dieser Artikel kann nur an eine deutsche Lieferadresse ausgeliefert werden.
Hinweis: Dieser Artikel kann nur an eine deutsche Lieferadresse ausgeliefert werden.