विचार करा कि आपली घरं आता फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रात आणि आकाशात देखील असतील, विनावाहक मोटारगाड्या फक्त रस्त्यावरच चालताना नाही तर आकाशातही उडताना दिसतील, हजारो मैल असलेले आपले आप्तस्वकीय फक्त संगणकाच्या पडद्यावरच नाहीत तर अगदी आपल्या जवळ असलेली भासतील आणि एवढंच नाही तर तुम्ही हजारो वर्ष निरोगी आयुष्यमानाचीही अपेक्षा धरू शकता. अतिशयोक्ती वाटते ना? पण हे नजीकच्या काळात प्रत्यक्षात आल्यास आश्चर्य वाटू नये. कारण जगभरात असेच एक ना अनेक प्रयोग यशस्वी करण्यात कैक शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. आताचे युग हे माहितीच्या आदानप्रदानाचे युग आहे हे वेगळे सांगावयास नको. २.५ क्वेन्टीलियन डाटाची निर्मिती दर दिवसाला होत आहे. दररोज निर्माण होणारा हा डाटा इतका मोठा आहे की जगभरात असलेला ९० टक्के डाटा केवळ मागील दशकात निर्माण झाला आहे. बिग-डाटा च्या प्रभावामुळेच संशोधनाची गती वाढण्यास नजीकच्या काळात मदत झाली आहे. फेसबुक कनेक्टीविटी उपक्रमांतर्गत सौरउर्जाचलित इंटरनेट विमान, त्या नंतर गंभीर अपघाताच्या वेळी अथवा शस्त्रक्रिया करताना केवळ १२ सेकंदात रक्तस्त्राव थांबवू शकेल अशा शेवाळ आधारित जेलचा शोध, जिभेवर ठेवताच तत्काळ विरघळणारी ३ डी प्रिंटेड औषधी गोळी, अतिवृष्टीच्या परिस्थितीत जलप्रलय टाळता यावे यासाठी १ मिनिटात ३००० लिटर पाणी शोषणारे सिमेंट, मानवी मलमूत्रापासून शुद्ध पाणी आणि उर्जानिर्मिती, डीएनए मध्ये आवश्यक बदल घडवणारा शोध ज्यामुळे जीनोममध्ये संभाव्य आजाराचा नको असलेला कोड काढून त्या जागी नवीन कोड बसवला जातो, इबोला रोगप्रतिबंधक लस, रोगप्रतिबंधक डास, कार मध्ये परावर्तीत होणारे विमान यांसह केवळ ५०० रुपयांत संगणक निर्मितीचे संशोधन..
Hinweis: Dieser Artikel kann nur an eine deutsche Lieferadresse ausgeliefert werden.
Hinweis: Dieser Artikel kann nur an eine deutsche Lieferadresse ausgeliefert werden.