लहान मुले अप्रत्यक्षपणे अर्थात पॅसिव्ह पद्धतीनेच अधिक शिकत असतात. आई-बाबा आणि घरातील वडीलधाऱ्यांच्या सवयी, शैली यांचं अनुसरण ते करतात. मोबाईलवर त्यांची बोटं सराईतपणे फिरू लागतात, गाण्याचे शब्द, त्याचे अर्थ कळत नसूनही ते गुणगुणू लागतात, नृत्य करू लागतात. असं बरंच काही शिकत असतात मुलं. रोज त्यांच्या कानावर येत असतील तर ती अगदी शिव्यासुद्धा शिकतात किंवा ओव्याही. आपण आपल्या मुलांना राजकारणसुद्धा व्यर्ज ठेवत नसू तर मग अर्थकारणासारखा विषय का बाजूला ठेवतो? पर्सनल फायनान्स, वित्तसाक्षरता हे शालेय क्रमिक अभ्यासक्रमात जेव्हा यायचे तेव्हा येतीलच पण पालक म्हणून आपण सुरुवात तरी करायला काय हरकत आहे? तीच सुरुवात करून देणारे हे पुस्तक..!
Hinweis: Dieser Artikel kann nur an eine deutsche Lieferadresse ausgeliefert werden.
Hinweis: Dieser Artikel kann nur an eine deutsche Lieferadresse ausgeliefert werden.