जमावाच्या मध्यभागी एक चिता रचण्यात आली होती, ज्या प्रमाणे हिंदू प्रेत आत्म्याला चितेवर अग्नी देऊन मोक्ष देतात अगदी त्याच प्रमाणे. पण ह्या चितेवर प्रेत नव्हते तर एक जिवंत महिला संगीताच्या तालावर आपलं शरीर एखाद्या नर्तकी प्रमाणे डोलावीत होती. तिच्या हात आणि पायच्या कृती मादक नृत्य वाटत होते. तिच्या भवती काही माणसे गोल नाचत होती, तर काही जणच्या हाती पेटलेल्या मशाली किंवा वेगवेगळी वाद्य. सारे कोणत्यातरी नशेत असावेत असे वाटत होते. संगीताने आता उच्चान्क गाठला, म्हणजे इंग्रजीतला क्रिसॅन्डो गाठला! त्या बाईचे हातवारे आता जोरात होऊ लागले, ती तिच्या भवती नाचणाऱ्यांना मादकतेने आपले हात लावीत होती आणि ते वाकून तिच्या अंगाला स्पर्श करून काहीतरी करीत होते. तिच्या अंगावर आता रक्ताचे डाग उठले होते. अचानक नाचणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या एका हाताने तिचे तोंड उघडून दुसऱ्या हाताने आपली करंगळी चिरून ओघळणारे रक्त तिच्या तोंडात टाकले. त्याचे रक्त तिच्या ओठावरून खाली गळ्यावर, मग तिच्या उघड्या स्तनांवर आणि नंतर जमिनीवर सांडू लागले. जुडी भितरली होती. तिच्या हृदयाची धड धड क्षणा क्षणाला वाढत होती आणि ऍडमला त्याच्या पाठीवर पडणारे तिच्या छातीचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते ----ठक, ठाक, ठक, ठाक! आणि जुडी मोठ्याने किंचाळली, ""बाप रे! ओ गॉड !""
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, B, CY, CZ, D, DK, EW, E, FIN, F, GR, H, IRL, I, LT, L, LR, M, NL, PL, P, R, S, SLO, SK ausgeliefert werden.