सब इन्स्पेक्टर अमर पाटील आणि आरोपी निखिल जगताप यांच्यात नक्की काय संबंध आहे, आपल्या संपूर्ण कुटुंबाचा खून केलेला निखिल अमरला बघून का चवताळतो, त्या दोघांच्याही आयुष्यात कोणत्या विचित्र घटना घडू लागतात या सगळ्याचा वेध घेणारी 'हसासोर' ही थरारक मालिका स्टोरीटेलवर २६ एप्रिलला रिलीज होईल. स्टोरीटेलवर यापूर्वी गाजलेली 'हिडन कॅमेरा' ही सिरीज लिहिलेल्या नीरज शिरवईकरने पुन्हा एकदा एक वेगळाच जॉनर निवडत हसासोर श्रोत्यांसाठी आणली आहे आणि विशेष म्हणजे या सिरीजला आवाज लाभला आहे अभिनेता ललित प्रभाकर याचा! यानिमित्ताने स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे हिने कट्ट्यावर नीरजशी गप्पा मारल्या आहेत, या मालिकेची पार्श्वभूमी, जॉनरची निवड अशा अनेक विषांवर रंगलेल्या या गप्पा नक्की ऐका! या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. हसासोर ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - storytel.com/in/en/search-hasasor सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.