स्टोरीटेल ओरिजिनल म्हणून अलीकडेच दाखल झालेली `अजातशत्रू` रसिकांची मने जिंकते आहे. अडीच हजार वर्षांपूर्वीच्या भारतवर्षात एक खूप विचित्र घटना घडली. मगध राज्याला 'साम्राज्य' बनवणाऱ्या सम्राट बिम्बिसाराचा त्याच्या स्वतःच्या पुत्राने खून केला. त्या पुत्राचे नाव 'अजातशत्रू'! त्यानंतर अजातशत्रूच्या मुलाने सिंहासन बळकावण्यासाठी त्याचा जीव घेतला. नंतर अजातशत्रूचा वंश संपेपर्यंत प्रत्येक राजपुत्र स्वतःच्या पित्याचा बळी देऊन सम्राट होत राहिला.. त्या प्रत्येकाला आपल्या बापाचा खून का करावासा वाटला असेल..? ह्या शापाची सुरुवात कशी झाली ह्याची ही वैचित्र्यपूर्ण कहाणी..! अशा या `अजातशत्रू`च्या पहिल्या भागातील हा छोटा अंश. सुमेधकुमार इंगळे यांनी लिहिलेल्या या कलाकृतीस आवाज लाभलेला आहे गजानन परांजपे यांचा. `अजातशत्रू` ऐकण्यासाठी [येथे](storytel.com/in/en/series/11717-Ajatshatru) क्लिक करा. स्टोरीटेलवरील हजारो पुस्तकांचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी [येथे](bit.ly/2VFoFeW) क्लिक करा.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.