दिवाळी स्पेशल डिस्काऊंट असतो... दिवाळी स्पेशल फराळ असतो... दिवाळी स्पेशल अंकदेखील असतो... मग दिवाळी स्पेशल पॉडकास्ट पण हवाच! स्टोरीटेल मराठीची खरी सुरूवात गेल्या दिवाळी पासून सुरू झाली. ह्या दिवाळीपर्यंत स्टोरीटेल मराठीने खूप मोठी मजल मारली आहे. मुळात ऑडिओबुक काय असते आणि त्याचा उपयोग काय ह्या प्राथमिक प्रश्नापासून झालेली सुरूवात... आणि तिथून पुढे, मराठी साहित्यातील दिग्गज आणि नामवंत लेखक-प्रकाशकांची पुस्तके मिळवून, स्वत:ची 'स्टोरीटेल ओरिजिनल' सिरीजची सुरूवात आणि त्याची वाटचाल, मराठी रसिकांचे ऑडिओबुक बद्दल सुरूवातीचे असलेले मत आणि नंतर त्यांची ह्या साहित्यप्रकारबद्दल बदललेली भूमिका आणि वाढलेली जवळीक... ह्या सर्वांचा लेखाजोखा म्हणजे हा पॉडकास्ट! सुरूवातीच्या अडथळ्यांपासून आत्तापर्यंतची वाटचाल आणि पुढील येत्या वर्षांत असलेले आव्हान... ना.सं. इनामदार, शिवाजी सावंत, विजय तेंडुलकर यांच्या अभिजात कलाकृतींपासून 'स्टोरीटेल ओरिजिनल'च्या अजातशत्रू ह्या मधयुगीन कालखंडावर असलेल्या ऑडिओबुकचा सिक्वल, स्टोरीटेलचा पहिला- पावनखिंडीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बेतलेला, संजय सोनावणी लिखित ड्रामा ही ठळक वैशिष्टपूर्ण कलाकृती आणि बर्याच काही गोष्टींवर उर्मिला बोलते करत आहे स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ, स्टोरीटेलचे पब्लिशर्स प्रसाद मिरासदार आणि सुकीर्त गुमास्ते आणि व्हॉईस ओव्हर आटिस्ट कास्टिंगचे राहूल यांना! हे पडद्यामागचे कलाकार आपले अनुभव, आलेल्या अडचणी आणि त्यांनंतर झालेले बदल आणि स्वत:ची ऑडिओबुकमधील आवडती कलाकृती याबद्दल भरभरून बोलणार आहेत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.