कोरोना आल्यापासून जवळपास दोन वर्ष शिक्षणक्षेत्र सुद्धा संकटात आहे. शिक्षक-विद्यार्थी घरीच असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय आला, मात्र त्यात खऱ्याखुऱ्या समोर भरणाऱ्या वर्गाची सर नाही. सर्वांकडेच ऑनलाईन शिक्षणाची उपकरणं नाहीत त्यामुळे अजूनही अनेक बालंक शिक्षणापासून वंचित आहेत. समाज घडवायला, त्याला समंजस करायला शिक्षणाचा मोठा वाटा आहे, मात्र शिक्षण पोहोचण्यातच काही अडचणी असतील तर त्यात काय उपाय शोधावे? शिक्षणाचं स्वरुप कसं असावं? परीक्षेतील गुणांवरून मूल्यमापन योग्य कि अयोग्य ? या सर्व समस्यांसाठी एबीपी माझाच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात शिक्षक दिन विशेष कट्ट्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांना आमंत्रित केलं गेलं. त्यांच्याशी झालेली खास मुलाखत ऐका - स्टोरीटेलवर !!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.