अडॉल्फ हिटलरला प्रेयसी होती. जवळजवळ मृत्यूच्या दारापर्यंत ती त्याची प्रेयसी म्हणून वावरली आणि मृत्यूच्या दाराअलीकडे काही अंतरावरच तिने पत्नी म्हणून 'सप्तपदी' अनुभवली. मृत्यूच्या सावलीत झालेलं हे जगावेगळं लग्न होतं. या स्त्रीचं नाव इव्हा ब्राऊ. तिने हिटलरसोबतच आत्मघात पत्करल्याने हिटलरच्या खासगी आयुष्याची ही एकमेव भागीदार आणि साक्षीदार काही सांगण्याकरता मागे उरलीच नाही. १४ वर्ष ती हिटलरसोबत राहिली, तरी हिटलर गेल्यानंतर बराच काळ इव्हाबद्दल काही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नव्हती. त्यानंतर काही काळाने ऐतिहासिक दस्त पुढे आले आणि इव्हा ब्राऊच्या रहस्यमयी आयुष्याचा उलगडा झाला. कसं होतं तिचं आणि हिटलरचं सहजीवन? ऐका वि.ग.कानिटकरलिखित 'अडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी' डॉ. प्रचिती कुलकर्णी यांच्यासह.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.