कोकणात शिवाजीराजांनी मांडलेल्या धुमाकुळाच्या बातम्या विजापूर दरबारात सतत येत होत्या. शाही दौलतीला सुरूंग लागत होते. गेली साडेतीनशे वर्षे सुलतानांच्या सुरीखाली बिनतक्रार मरणारे हे मराठे खवळून उठले होते. मग बादशहाने एकाच घावात हा मराठी दंगा ठेचून काढण्याचा मनसूबा आखला. पण या मोहिमेचा सेनापती कोण? बादशाहाने दरबार भरवला आणि शाही तख्तापुढे ताटात विडा मांडण्यात आला. सारा दरबार चित्रासारखा स्तब्ध होता. तेवढ्यात एक प्रचंड देह रपरप पाऊले टाकत पुढे झाला. त्याने विडा उचलला. या देहाचे नाव अफझलखान...!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.