खान आपल्याला निश्चित दगा करणार याविषयीच्या खात्रीलायक बातम्या राजांना मिळाल्या होत्या. म्हणून राजे अत्यंत दक्ष होते. त्यांनी खानाच्या फौजेभोवती आपल्या मावळी टोळ्या दबा धरून बसवण्याची व शिरवळ, सासवड सुपे या ठाण्यावर भेटीच्याच दिवशी हल्ले चढवण्याची योजना केली. भेटीच्या आदल्या रात्री राजांनी गडावर सर्व जिवलगांबरोबर सल्लामसलत केली. समजा दगाफटका झाला तरीही सर्वांनी नेताजी पालकरांच्या सेनापतित्वाखाली झुंजावे असा आदेश राजांनी सर्वांना दिला. यावेळी खान आपल्या छावणीत भावी यशाची स्वप्ने पाहत होता. आपल्या यशाविषयी तो निःशंक होता म्हणूनच तो गाफील होता !
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.