आंध्र प्रदेशातल्या वादळात केलेलं मदतकार्य, फुटीरतावादी खलिस्तान चळवळीच्या काळात पंजाबमध्ये केलेलं काम, बांग्लादेशी घुसखोरांविरोधात आसाममध्ये झालेलं काम, ईशान्य भारतातली फुटीरतावादी चळवळ, अस्वस्थ काश्मीर, रामजन्मभूमी प्रश्, त्यातून उद्भवलेला हिंदू-मुस्लीम सहसंबंधाचा प्रश्न असे अनेक प्रश्न जाणून घेण्यासाठी अविनाश धर्माधिकारी तरुणपणी देशभर फिरले. समाजबदलाची आशा मनात बाळगलेला एक तरुण सोळाव्या वर्षी देशकार्याचं स्वप्न बघतो, त्यानंतर उभा आडवा भारत पिंजून काढतो, मदतकार्य, युवकांची शिबिरं, सामाजिक उपक्रम अशा नाना उचापती काय करतो..या उचापती करताना, थोडक्यात लष्कराच्या भाकऱ्या भाजताना या तरुणाला दशकभराच्या फिरस्तीच्या काळात गवसलेला भारत म्हणजे अस्वस्थ दशकाची डायरी!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.