'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' म्हणजेच व्यासांनी जगातलं सगळं ज्ञान उष्टं करून सोडलं आहे. ( म्हणजे, जगात असा कोणताही विषय नसेल, ज्याला महर्षी व्यासांनी त्यांच्या लेखनात स्पर्श केला नाही) असा समज सर्वत्र आहे. कारण, भगवदगीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये मानवी जीवनातल्या नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचं सखोल विवेचन केलं आहे. अनेक धर्मातल्या तत्वज्ञांनी, विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी भगवद्गीतेची प्रशंसा केली आहे. महात्मा गांधींपासून ते अल्बर्ट आईन्स्टाईनपर्यंत अनेक थोरांना भगवद््गीतेने प्रभावित केले आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.