आपल्या बोक्या सातबंडेला सगळ्यांना मदत करायला आवडतं, हे तर तुम्हाला माहीतच आहे. यावेळी त्यानं संगीताला मदत करायचं ठरवलंय. त्याचं असं आहे की, बोक्याच्या कॉलनीतल्या टोकावरच्या बिल्डींगमध्ये एक खडूस माणूस राहतो, हंगामे नावाचा. तर या हंगामेंच्या घरी, त्यांच्या नात्यातली एक मुलगी राहते - संगीता. हल्ली संध्याकाळी बोक्या खेळायला खाली जातो, तेव्हा त्याला नि त्याच्या मित्राला तिच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. का रडत असावी संगीता? ती नेमकी कोणत्या संकटात आहे आणि या संकटाची चाहूल लागल्यावर बोक्या तिला त्यातून कसं वाचवतो? त्याचीच ही गोष्ट आणि सोबत बोक्याच्या आणखी ३ धमाल गोष्टी! ऐका दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात त्यांच्याच लेखणीतून साकारलेलं - 'बोक्या सातबंडे: भाग - २'
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.