मोबाईलवर नोंदणी करून लस घेता येणं, आणि त्यानंतर मोबाईलवरच ती घेतल्याचं सर्टिफिकेट मिळणं- ही एव्हाना अशक्य वाटणारी गोष्ट कोविनमुळे शक्य झाली. या सगळ्यावर कळस म्हणजे भारताने कोविन अॅप अन्य देशांना मोफत उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आणि तात्काळ जवळपास ५० देशांनी हे अॅप वापरण्याची इच्छा दर्शवली. भारतात तयार झालेलं अॅप जगातले ६० ते ७० देश आत्ता वापरत आहेत, ही फक्त कोविडविरोधी लढ्यातली नव्हे, तर एकुणातच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची 'सॉफ्ट पॉवर' वाढवणारी गोष्ट आहे. हे कसं शक्य झालं, आणि येत्या काळात याचा भारताला काय फायदा होऊ शकतो, जाणून घेऊया.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.