श्री. वि. ग. कानिटकर यांनी या छोट्या "दर्शन-ज्ञानेश्वरी" पुस्तकामध्ये आजच्या साहित्यप्रेमी धावत्या वाचकास ज्ञानेश्वरीच्या साहित्यिक गोडीची भरपूर वानगी दिली आहे. ज्ञानेश्वरीकडे धर्मप्रेरणेने आणि धर्मजिज्ञासेनें वळणाऱ्या वाचकांइतकेच आजच्या काळांत ज्ञानेश्वरीच्या साहित्यगुणामुळें आकर्षित होणारे लोक पुष्कळ आहेत. आधुनिक सुशिक्षितांचा कल ज्ञानेश्वरीच्या अवलोकनाकडे वळतो तो मुख्यतः तिच्या वाङ्मयात्मक श्रेष्ठतेमुळे. गूढतत्त्वज्ञाची उकल, भक्तिरसाचा गगौंघ, साहित्याचे लेणे होण्यासारखे भाषासौष्ठव आणि उपमालंकाराचें वैभव यांचा अपूर्व संगम ज्ञानेश्वरींत झाला आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.