सांगली शहरातील तळ्यापाशी एका वेड्याचा मृतदेह मिळाल्याची बातमी एके सकाळी पेपरात छापून आली. तो वेडा आदल्याच दिवशी वेड्यांच्या इस्पितळातून पळून गेला होता. पोलीस तो मृत्यू म्हणजे एक वेडाच्या भरात केलेली आत्महत्या म्हणून सोडून द्यायच्या विचारात आहेत. पण दुसरीकडे अल्फाला तो एक खून असल्याचे पुरावे मिळतात आणि तो त्या वेड्याच्या मृत्यूचा तपास सुरू करतो. जसाजसा या प्रकरणाचा तपास पुढे सरकतो, तसतसे त्याच्याशी संबंधित व्यक्तींचे खून व्हायला लागतात. सगळ्यात गूढ गोष्ट म्हणजे खुनी प्रत्येक मृतदेहाजवळ एक तीन अक्षरी संकेत सोडतो, ज्यामुळे या मृत्यूंचं रहस्य आणखीच वाढतं. हे सगळं कोण घडवून आणतंय? तळ्याजवळ मेलेल्या वेड्याला काहीतरी गुपित ठाऊक होतं, हे नक्की. ते गुपित झाकण्यासाठीच ही खुनांची साखळी सुरू झाली होती. पण ते गुपित काय होतं? हा सगळा एखाद्या भयंकर कटाचा भाग आहे का? आणि त्या तीनअक्षरी संदेशाचं रहस्य काय आहे?
Bitte wählen Sie Ihr Anliegen aus.
Rechnungen
Retourenschein anfordern
Bestellstatus
Storno