दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आत्मा माणसाची सर्व बरीवाईट कृत्यं बघत असतो. सूर्याला अंधार बघता येत नाही. अमृताला मृत्यू बघता येत नाही. परंतु त्रिगुणांच्या प्रभावामुळे मनुष्यामधे उत्पन्न होणारे बरेवाईट व्यापार आत्म्याला मात्र बघता येतात. हाच ज्ञानयोगाचा मार्ग असतो. त्यासाठी फलाशा, आसक्ती आणि कर्माभिमान मात्र प्रथम सुटला पाहिजे. मग कर्मंच ईश्वरार्पण केली की निष्काम कर्मयोग साध्य होईल. निष्काम कर्मयोग हेच ध्यानयोगाचंही साधन असतं.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.