दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... विश्वात एकच परमेश्वर अंतर्बाह्य ओतप्रोत भरून राहिला आहे. त्याच्या केवळ अस्तित्वानं सृष्टी हलते. सामान्य मनुष्याला सामान्य दृष्टीनं दूरच्या गोष्टी दिसत नाहीत. त्याकरता त्याला दुर्बिणीचा वापर करावा लागतो. दुर्बिणीच्या साह्यानं तो दूरवरच्या गोष्टी जवळ असल्याप्रमाणे पाहू शकतो. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य आपल्या ज्ञानचक्षूरूपी दुर्बिणीनं क्षेत्र-क्षेत्रज्ञ भेद जाणू शकतो. असा हा जाणता या प्रकृतीमधल्या सुखदु:खरूपी खेळातून मुक्त होतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.