दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... इहलोकी सृष्टिरूप वृक्षाचं स्वरूप दिसत नाही. त्याचप्रमाणे त्याचा अंत, आरंभही आणि स्थिती म्हणजे मध्यही दिसत नाही. संसारवृक्ष मिथ्या आहे तरी तो सुख-दुःखांनी ओतप्रोत भरलेला आहे. जर अंतिम आनंद मिळवायचा असेल, तर संसारवृक्षाचा उच्छेद करायला हवा. मग सृष्टिक्रमाची ही पुरातन प्रवृत्ती ज्याच्यापासून निघाली त्या आदिपुरुषाला ज्ञानाच्या अंगानं शरण जावं. त्या ठिकाणी गेलं असता पुन्हा परत येणं होत नाही.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.