दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... पाण्याला जसा ओलेपणाचा त्याग करता येत नाही त्याप्रमाणे देहधारी मनुष्याला कर्माचा त्याग करता येत नाही. अग्नी उष्णतेचा त्याग करू शकत नाही. तसा मनुष्य जोपर्यंत मर्यादित जाणिवेत रहात असतो तोपर्यंत कर्माचा त्याग करू शकत नाही. चंदन आणि सुगंध यांच्यात भेद संभवत नाही. त्याप्रमाणे मनुष्य आणि कर्म यांच्यात भेद संभवत नाही. म्हणून विकारादी संवेदनांना प्रगल्भ करून पंचकोशांना अनायसे पुष्ट करत गेलं तर मनुष्य जाणिवेतली वैश्विकता अनुभवू शकतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.