दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... सत्त्व, रज, तम या त्रिगुणांच्या भेदानुसार कर्मही तीन प्रकारचं असतं. ज्याची जशी वृत्ती तसं त्याचं कर्म असतं. सात्त्विक मनुष्य आत्मविकासार्थ सात्त्विक कर्मं करतो. राजसी मनुष्य विविध भोग आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी राजस कर्मं करतो तर तामसी मनुष्य तामस अज्ञानयुक्त भावनेतून कर्मं करतो. त्या त्या गुणांच्या कर्मांचेही तसेच उत्कृष्ट, कष्टदायक आणि हीन परिणाम होतात. म्हणून कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी सात्त्विक कर्माचं अनुसरण केलं पाहिजे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.