दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आपलं चित्त जाणीवपूर्वक परमेश्वराच्या ठिकाणी ठेवलं तर भगवंताचाच अनुग्रह होऊन सर्व संकटं किंवा शुभाशुभ फलं तरून जाता येतात. कारण मुळात सुख-दुःखं नसतातच. अहंकार जोपासल्यामुळे ती भासत असतात. म्हणून अहंकार बाळगून सर्व कर्मं केली तर तो मनुष्य दुःखाला आणि पर्यायानं नाशाला कारणीभूत होतो. प्राप्त कर्म करतानाच अहंकाररहित होऊन परमेश्वर चिंतनातच साधकानं गढून गेलं पाहिजे. असा मनुष्य सुख-दुःखातीत होऊन जाईल.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.