महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनकार्य त्यांना युगपुरुषाचा उंचीवर घेऊन जातं. एका नजरेत सामावणार नाही असे असंख्य पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. त्या प्रत्येक पैलूसाठी महापुरुषांच्या पंगतीत जाऊन बसण्याची त्यांची योग्यता होती. आधुनिक जीवनाचं असं एकही क्षेत्र नाही ज्यात कार्यरत असलेल्या व्यक्तीला कर्मयोग्याचं उदात्त उदाहरण म्हणून बाबासाहेबांचं स्मरण होणार नाही. बुद्धीनं तीक्ष्ण आणि विचारानं तरतरीत असलेल्या बाबासाहेबांचं जीवन एका अथांग संघर्षाचं उदाहरण आहे. आपलं अलौकिकत्व प्रत्येक पावलावर त्यांना सिद्ध करावं लागलं. जन्मापासून सुरू झालेल्या या संघर्षानं मृत्यूपर्यंत पाठ सोडली नाही.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.