आहार विषयावर मोठे संशोधन करणाऱ्या आणि त्यासाठी अविरत कष्ट करणाऱ्या डॉ. कमला सोहोनी ह्या पहिल्या आहारतज्ञ. आहार गाथा ह्या पुस्तकातून त्यांचे बरेच संशोधन प्रकाशित आहे. जीवनसत्वे, पोषणमूल्ये, विविध आजार ह्यावर त्यांनी केलेले संशोधन आजही तितकेच उपयुक्त आहे. त्यांच्यावरील ही छोटी पुस्तिका. भारताला विज्ञानाची फार मोठी उज्ज्वल परंपरा लाभली आहे. सुमारे अडीच – तीन हजार वर्षांपूर्वी भारताच्या सुवर्णयुगात विज्ञानधिष्ठीत जीवन पद्धती भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केली होती. अशा शास्त्रज्ञांची चरित्रे चित्रमय स्वरुपात समाजात उपलब्ध व्हावीत यासाठी भारतीय विचार साधनाने 'चित्रमय भारत भारती' हा प्रकल्प हाती घेतला आहे. अतिशय आकर्षक चित्रे आणि सोबत कथेद्वारे माहिती सांगणारे हे डॉ. कमला सोहोनी यांचेवरील पुस्तक.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.