सध्या देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका चालू असल्याने राजकीय चर्चा, आरोप प्रत्यारोप, हेवेदावे यांनी वातावरण तापवलं आहे. निवडणूक हा भारतात एक उत्सव असतो हे पुन्हा एकदा या निवडणुकांच्या निमित्ताने दिसून येतंय. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला सविस्तर मुलाखत दिली. त्यात त्यांनी याआधीही एकदोनदा बोलून दाखवलेला एक मुद्दा पुन्हा नव्याने मांडला, आणि त्यावर चर्चा सुरू झाली. तो मुद्दा म्हणजे 'वन नेशन, वन इलेक्शन'. खरंतर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत पहिल्यापासून आग्रही भूमिका घेत आलेत, पण अशी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेणं शक्य आहे का? त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचा उहापोह आपण आज करणार आहोत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.