संत एकनाथकालीन महाराष्ट्र हा सुलतानी राज्यकर्त्यांची अनिवार राज्यतृष्णा, त्यांचे पराकोटीचे धर्मवेड आणि अमानुष आततायीपणा यांत पोळून निघाला होता. ही स्थिती बदलण्यासाठी लोकजागृती करून समाजापुढे आदर्श उभा करावयास हवा, यासाठी एकनाथ रामायणाकडे वळले. त्यांचा श्रीराम हा पतितपावन आहे, तसाच कोदंडधारीही आहे. म्हणूनच भावार्थ रामायण हे भक्तिरामायण आहे, तसेच पुरुषार्थ रामायणही आहे. एकनाथांनी वाल्मीकींच्या रामकथेचा उलगडा देशभाषा मराठीतून करताना आपल्या सामाजिक मनाची साक्षही पटविली आहे. अधर्माची वार्ता नाही, असे रामराज्य उभारले जावे, हे त्यांचे स्वप्न त्यांनी बोलून दाखविले आहे. द्रष्टेपणाने त्याला आकार दिला आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.