अख्ख्या जगाच्या नजरा गेल्या काही दिवसांपासून ज्या डीलकडे लागल्या होत्या ते डील अखेर पार पडलं. टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्क याने ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी तब्बल ४३ मिलियन डॉलर्सना विकत घेतली. ट्विटरच्या भवितव्याबद्दल तीन चार वर्षांपासून उलटसुलट चर्चा चालू होत्या. ट्विटरची आर्थिक परिस्थिती पाहता कंपनी चालणार की नाही, यावरच प्रश्नचिन्ह होतं. या सगळ्या चर्चांना या डीलमुळे पूर्णविराम मिळालाय. मुळात ट्विटर विकत घेण्यामागे इलॉनचा विचार काय होता? एखादी तोट्यात असलेली कंपनी विकत घेणं, आणि तीही इतका पैसा मोजून विकत घेणं… यामागचं गौडबंगाल नक्की काय आहे, याची उत्तर दडली आहेत ती इलॉनच्या व्यक्तिमत्त्वात आणि त्याच्या आजवरच्या प्रवासात! म्हणून त्याचा आजवरचा प्रवास नक्की कसा होता, हे आज आपण जाणून घेणार आहोत…. चला तर मग!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.