फाफे आणि त्याचा रुममेट सुभाष देसाई एक दिवस सायकल काढून फिरायला गेले. ते पावसाळ्याचे दिवस. त्यामुळे सगळीकडे नुसतं हिरवंगार झालं होतं. अशा प्रसन्न वातावरणात गळ्यात गलोल टाकून, सायकलवर टांग टाकत हे दोघं नदीकिनारी गेले. झाडावरच्या चिंचा, उंबरं गलोलीनं पाडता पाडता, सुभाषला एका झाडावर, कावळीचं घरटं दिसलं. त्यानं गलोलीनं नेम धरून त्या दिशेनं एक दगड भिरकावला, त्याबरोबर बिचाऱ्या कावळीचं ते घरटं पडलं...पण त्यातून कावळीची पिल्लं, अंडी वगेरे खाली न पडता चक्क एक सोन्याची माळ पडली. आता कावळीच्या घरट्यात ही सोन्याची माळ कशी आली बुवा? असं कोडं पडलंय ना? ते सोडवायचं तर ऐकुया, 'फास्टर फेणेच्या गळ्यात माळ' अमेय वाघसोबत!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.