चाकणच्या किल्लेदाराचे नाव फिरंगोजी नरसाळा. किल्ल्यात जास्तीत जास्त सैन्य तीनशे होते. शाहिस्तेखानाच्या फौजेचा वेढा किल्ल्याच्या सर्व बाजूने होता. मराठ्यांचा प्रतिकार भयंकर होता. दारूचे स्फोटक बाण सोडून मराठे मुघलांना हैराण करत होते. महिना होत आला तरी मूठभर सैनिक एकवीस हजार सैन्याला दाद देत नव्हते. एकेदिवशी खानाच्या छावणीत बेत ठरला की किल्ल्याचा बुरूज सुरूंगाने उडवायचा आणि किल्ल्यात घुसायचे. ऐन पावसाळ्यात मुघलांनी भुयार तयार केले व त्यात मोठमोठे सुरूंग ठासून भरले. आणि तो दिवस उगवला १४ ऑगस्ट १६६० चाकणचा घातवार...!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.