सर आयझॅक न्यूटन (एफ. आर. एस्. ) (२५ डिसेंबर १६४२ - २० मार्च १७२७) हे एक भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडून केप्लरचे नियम सिद्ध केले. गतिकीमध्ये तीन गतीचे नियम मांडले. त्यांनी परावर्ती दुर्बीण बनवली, व प्रकाशाचे मूलभूत रंगात विघटन करून दाखविले. गणितामध्ये त्यांनी ग्यॉटफ्रीड लिब्नित्झ याच्याबरोबर कलन ही गणितशाखा विकसित केली. टेलिस्कोपच्या शोधानंतर न्यूटन रॉयल सोसायटीचा सदस्य बनला. रॉयल सोसायटीचं सदस्यत्व प्रतिष्ठित वैज्ञानिकांनाच दिलं जातं. न्यूटनला लोकांमध्ये मिसळणं आवडत नसे. त्यामुळे तो 1679मध्ये आपल्या वूल्सथॉर्पच्या घरी परतला. या काळात त्याने शिसे या धातूपासून सोनं बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रयोगांना 'अलकेमी' असं म्हटलं जात असे. न्यूटननं आपल्या आयुष्यातील कित्येक वर्षं यासाठी खर्च केली. काही जण म्हणतात याच काळात त्याने गतीच्या आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा शोध लावला, पण त्याबाबत तो कुठं बोलला नाही. न्यूटनच्या आयुष्याबद्दल जाणून घ्या… .
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.