"या अण्वस्त्राने राष्ट्राराष्ट्रांतले संबंध पार बदलून टाकले असून याचा परिणाम माणसामाणसामधल्या नातेसंबंधावर पण होणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यापुढे बॉम्ब बनवलाच जाऊ नये!" असे म्हणणारा जे. रॉबर्ट ओपेनहायमर आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यमग्न राहिला. या बुध्दिमान, कल्पक, यशस्वी संशोधकाला सर्वसामान्य लोकांनी भरभरून प्रेम दिलं पण सरकारने मात्र कायम तराजूत तोललं. मृत्यूनंतरही कायम अपमानित केलं. आयुष्याच्या अखेरीला त्याला अत्यंत क्लेशकारक जीवन कंठावे लागले. प्रत्यक्ष अणुबॉंबच्या बनवण्यात सहभागी असल्याने एकीकडे त्याला अणुबॉंबचा जनक म्हणून गौरविले गेले तर दुसरीकडे मृत्यूनंतरही अवहेलनाच त्याच्या वाट्याला आली. त्याचे चरित्र म्हणूनच ऐकण्यासाठी रंजक आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.