लीझ माइटनर ही एक थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ होती. ज्यू धर्म त्यागूनही ज्यू ठरवली गेल्याने जर्मनीतून हद्दपार झाली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन राहिली. मूळची ऑस्ट्रियन असणा-या लीझने आपल्या अणुविखंडनातील संशोधनाने आभिमानास्पद कामगिरी केली. ... आईन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरूषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक श्रेयसुद्धा सहका-यांकडून हिरावून घेतलं गेलं आणि तरीही किरणोत्सर्ग व अणुविखंडन या बाबतीतल्या संशोधनामधले जिचं अभिजात कर्तृत्व उपेक्षेच्या आणि वंचनेच्या सा-या वार-प्रहारांनंतरही टिकून राहिलं, ती विसाव्या शतकातील थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ होती.... वैज्ञानिक क्षेत्रातल्या अनोख्या सत्तासंघर्षाच्या विस्मयकारी दर्शन घडवणारं, लीझ माइट्नरचे हे उत्कंठवर्धक चरित्र ऐकायलाच हवे....!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.