जागतिकीकरणानंतर जग हे छोटं खेडं झालं आहे या आशयाची वाक्य आपण अनेक वेळा ऐकतो. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे जगातील कोणतीही वस्तू सर्वांना उपलब्ध होऊ लागली आहे. एके काळी महाग व फक्त श्रीमंतांची मक्तेदारी असणा-या वस्तू मध्यमवर्गाला उपलब्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे श्रीमंत आणि गरीब यातील दरीही वाढते आहे. सगळ्याच देशांनी एकसारखी धोरणं आखण्या ऐवजी आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि वैशिष्ट्य लक्षात घेऊन धोरणं आखायला हवीत असे या पुस्तकात स्टिग्लि्टझ म्हणतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.