एचडीएफसी बँक! विश्वासार्हता, पारदर्शकता, उत्तम सेवा, प्रशासकीय पकड या गुणांच्या जोरावर गेली ४५ वर्षे एचडीएफसी भारतात काम करतेय. आजवरच्या व्यावसायिक प्रवासात या कंपनीने लाखो भारतीयांचं स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलंय. एचडीएफसीच्या या संपूर्ण प्रवासाचे सारथी म्हणजे दीपक पारेख! एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक या दोन वेगवेगळ्या संस्था होत्या. या दोन कंपन्यांनी नुकतीच विलीनीकरणाची घोषणा केली. एचडीएफसी लिमिटेड ही भारतात गृहवित्त, म्हणजेच होम लोन्स देणारी सर्वात मोठी कंपनी आणि एचडीएफसी बँक ही भारताच्या खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक! या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाने काय साध्य होणार? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन संस्था एकत्र आल्यानंतर जगातील सर्वोच्च १०० कंपन्यांच्या यादीत एचडीएफसीला जागा मिळवता येणार आहे. एचडीएफसीचा हा प्रवास ज्या व्यक्तीने घडवून आणला त्या दीपक पारेख यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.