त्यादिवशी हिराला आवाज ऐकू येत होता रायगडावरच्या दसऱ्याच्या लगबगीचा. शिवाजी राजांची दसऱ्याची स्वारी, गडावरचा थाट, बाजारहाट, राजाच्या राण्या हे सगळं सगळं बघण्याचं कुतूहल तिच्या मनात ओसंडून वाहत होतं. आणि अश्विन पौर्णिमेच्या म्हणजेच कोजागिरीच्या दिवशी गाव-पाटलांकरवी तिला गडावर दूध घालायला जाण्याचा सांगावा आला. हिरासाठी, ही खूप मोठी संधी, तिच्या शिवाजीराजांना बघण्याची…हिरा गडावर कशी गेली...सुर्यास्तादरम्यान गडाचे दरवाजे बंद झाल्यावर गड उतरून कशी आली, त्याची ही चित्तथरारक, विलक्षण साहसी कथा. हिरकणीची गोष्ट तशी आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण या झुंजार स्त्रीनं घडवलेला इतिहास आपल्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा अक्षरश: जिवंत करत ही गोष्ट सांगितली आहे, खुद्द 'हिरकणी'चे लेखक - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.