गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या 'नॅसडॅक'वर म्हणजे तिथल्या शेअर बाजारात एक मोठी घटना घडली - 'फेसबुक' कंपनीचा शेअर एकाच दिवसात जवळपास २० टक्क्यांनी कोसळला. त्यांची जेवढी मार्केट व्हॅल्यू एका दिवसाच्या ट्रेडिंगमध्ये कमी झाली तेवढ्या रकमेचं भारताचं बजेट असतं, अशी चर्चा त्यावेळी झाली. त्याचं तात्कालिक कारण असं होतं, की फेसबुकचे डेली अॅक्टिव्ह युजर्स, म्हणजेच फेसबुक वापरकर्त्यांची संख्या या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये पहिल्यांदाच कमी झाली. हे कारण वरकरणी खरं असलं आणि त्याच्यावरचं विश्लेषण व उलटसुलट चर्चा तंत्रज्ञान विश्वात होत असली, तरी या घटनेमागे काही वेगळीच आणि तितकीच खरी कारणे आहेत, ती आपण आज समजून घेणार आहोत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.