रघुवीर कुलकर्णी लिखित व्यक्तिचित्र : अब्दुल भायखळा ब्रीजवरून फिरायला जाताना मला नेहमी अब्दूल भेटत असे. अब्दुल आमचा हजाम. वीस- बावीस वर्षांपर्यत तोच आमचे केस भादरायचा. अब्दुल बरोबर नऊ वाजता घरी हजर होत असे. त्याच्या पेटीत विविध प्रकारची केस कापायची हत्यारे होती. केस कापत असताना तो तुलसीरामाचे रामायणाचे दोहे गात असे. उत्तर प्रदेशातील गावाकडे रामलीलेशिवाय त्याने काही ऐकले नव्हते. अचानक एकदा तो दोन तीन महिने दिसला नाही तेव्हा कॉलनीत अस्वस्थता पसरली. हा गेला कुठे असे सगळे विचार करत असताना अब्दुल शर्ट, पॅंट घालून आणि कातडी बॅग घेऊन आला. एका पारशी बाबाची दाढी करण्यासाठी अब्दुल लंडनला गेला आणि पूर्ण बदलून आला. एका फॉरेन रिटर्न बार्बरची ही कहाणी...
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.