रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र - नलेश नलेश आपल्या नावाबद्दल फार आग्रही होता. निलेश खूप सापडतील पण नलेश एकटाच. त्याच्या सहीवर तो पक्षाचे चित्रही काढायचा. नलेशने केलेले प्रॅक्टिकल जोक्स सगळ्यांच्या लक्षात राहिले. त्याने केलेल्या शाब्दिक कोट्याही अफलातून असायच्या. बसमधून येताना कुणी एक खार म्हणून तिकीट मागितले की हा म्हणायचा मला एक कुत्रा द्या. कंडक्टर तिकीट काढायला आला की हा पळत पळत मागे जात असे आणि मागच्या सीटवर बसून तिकीट काढे. कंडक्टरने विचारले असे का केलेस की तो पाटी दाखवायचा तिकीट मागून घ्या! एकदा अमोल पालेकरच्या घरातल्या कुत्र्याचं नाव नेपोलियन आहे हे कळल्यावर तो म्हणाला त्याला बांधून ठेव नाहीतर तो आमचा बोन अपार्ट करायचा! अशा नलेशच्या गंमती जमती महाविद्यालयीन जीवनानंतरही कायम राहिल्या. त्या सगळ्या आठवणींचा हा धांडोळा !
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.