केवळ भारताचाच नव्हे, तर साऱ्या वैश्विक मानवी व्यवहारांचा आरसा असलेलं महाभारत पुन्हा पुन्हा वाचलं, तरी प्रत्येकवेळी नवी दृष्टी देऊन जाते. वि. ग. कानिटकर यांनी या पुस्तकात महाभारताची कथा रसाळपणे सांगितली आहे. सर्व रसांचं अद्भुत कॉम्बिनेशन असलेलं महाभारत मानवी मनं, भावभावना, नातेसंबंध, हिंसा आणि शांती यांचं 'बर्ड आय व्यू' दर्शन घडवतं. आदिपर्व, सभापर्व, वनपर्व, विराट पर्व, उद्योग पर्व, भीष्म पर्व, द्रोण पर्व, कर्ण पर्व, शल्य पर्व, सौप्तिकपर्व, स्त्रीपर्व, शांतीपर्व व अनुशासन पर्व, अश्वमेथिक पर्व, आश्रमवासिक पर्व, मौसलपर्व, महाप्रस्थानिक पर्व आणि अखेरीस स्वर्गारोहण पर्व या भागांत कालानुक्रमे विभागलेलं, एका अलौकिक इतिहासाचं हे दर्शन...वि.ग.कानिटकरलिखित 'महाभारत - पहिला इतिहास' राहुल सोलापूरकर यांच्या आवाजात
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.