रघुबीर यादव या अभिनेत्याची भूमिका असलेला 'पीपली लाईव्ह' नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. त्यातलं 'मेहंगाई डायन खाए जात है' हे गाणं विशेष गाजलं. दबक्या पावलांनी येणाऱ्या आणि हळूहळू आपला खिसा खाली करणाऱ्या महागाईचं हे परफेक्ट वर्णन म्हणावं लागेल. वाघ जसा दाट झाडीमध्ये दबा धरून बसतो आणि सावज जवळ आल्यावर त्यावर झडप घालतो, तसंच महागाईबाबतही घडतं. फरक इतकाच आहे की, महागाई किंवा दुसऱ्या शब्दात चलनवाढ, थेट झडप घालत नसली तरी ती दबक्या पावलाने येेते. ही महागाई अर्थात चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी तात्पुरते आणि दीर्घकालीन उपाय वेळीच योजले गेले नाहीत, तर काय होऊ शकतं? महागाई का वाढते? ती नेहमी वाईटच असते का? चला, जाणून घेऊ.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.