मुंबईचा एक तरुण मुष्टियोद्धा अश्रफ अचानक बेपत्ता होतो. त्याला शोधून काढण्याची जबाबदारी त्याचा भाऊ रौफ घेतो. पण अश्रफ कोठे गेला? कुणासोबत गेला? का गेला? तो कोणत्या संकटात सापडला आहे? अश्रफला हुडकून काढणे आणि परत आणणे हे काम अजिबात सोपे नाही. तथापि या अशक्यप्राय कामात त्याला हिंदरक्षक नावाच्या देशभक्त संघटनेची मदत मिळते. ही संघटना लढाऊ आहे; शस्त्रसज्ज आहे; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशहितासाठी जीव ओवाळून टाकणारी आहे. संघटनेची लेफ्टनंट कमांडर रुख्सार खान हिच्या मनात रौफबद्दल एक हळुवार भावना आहे. रौफला त्याच्या उद्दिष्टात सफलता मिळवून देण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. पण अश्रफला परत आणणे त्यांना जमेल का?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.