अभिमन्यूने रामलाल यादवचा शोध घेण्यासाठी मोरे आणि पाटीलला कामाला लावलंय. ते दोघं यादवच्या मूळापर्यंत कसे पोहोचतील? युट्युबर विनिता गुजर मेली... जिलेटिनच्या कांड्या, बारगर्ल आणि आता विनिता गुजर. नक्की काय चाललंय मुंबईत? ज्या गाडीने ठोकर मारल्यामुळे विनिता गुजर मेली, त्या गाडीचा ड्रायव्हर गंभीररित्या जखमी झालाय. या तिन्ही गोष्टी इंटरलिंक्ड आहेत का? हा मोठा प्रश्न अभिमन्यूसमोर आ वासून उभा आहे. पण एक पॉजिटिव्ह न्यूज त्याला मिळते. जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेल्या कारच्या मालकाचा शोध लागतो. आता त्याला ताब्यात घेतलं की सगळ्या प्रकरणाचा उलगडा होईल. पण आहे तरी कोण तो? त्यानेच ती गाडी सॅम डिसुजाच्या घराबाहेर उभी केली असेल का? पण का? कारण काय?....
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.