नल-दमयंती यांची कथा अनेक लेखकांनी आपआपल्या कल्पनाशक्तीने आजपर्यंत रंगवली आहे, पण स्टोरीटेलवरची ही कथा निश्चितच वेगळी आहे. या कथेमध्ये एक दिवस अचानक ब्रम्हदेवाला पृथ्वी आणि मनुष्यजाती निर्माण केल्याचा पश्चाताप होतो आणि तो ती नष्ट करायला निघतो. त्यावेळी हेमांग नावाचा एक दिव्य हंस ब्रम्हदेवाला तसे न करण्याची विनंती करतो. तेव्हा ब्रम्हदेव हेमांगला म्हणतो, मला पृथ्वीवरची अशी एक महिला किंवा पुरूष दाखव ज्यांचं मन विश्वास, नशिब, प्रसिध्दी किंवा सुंदर रूप गेल्यानंतरही विचलित होत नाही. त्यांना पाप पराजित करू शकत नाही, तसा दाखवू शकलास तर मी माझा विचार बदलीन. ब्रम्हदेवाचा विचार बदलण्यासाठी हेमांग पृथ्वीवर येतो आणि नल-दमयंतीचा शोध घेतो. संपूर्ण मनुष्यजात वाचवण्यासाठी नल-दमयंतीला कोणकोणत्या परीक्षांमधून जावं लागतं, यातून प्रेमाचा विजय होतो का…….हे या गोष्टीतून ऐकायला मिळेल.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.