अकबर बिरबलाच्या कथा तुम्ही लहानपणी ऐकल्या असतील. त्यातली एक गमतीशीर कथा आहे. बादशहा अकबर विचारतो, 'आपल्या राज्यात कावळे किती?' बिरबल सांगतो, '३ लाख ९६ हजार ७५३' बादशहा विचारतो, 'कशावरून?' बिरबल म्हणतो, 'मोजून बघा!' बादशाहाला आश्चर्य वाटतं. तो विचारतो, 'या आकड्यापेक्षा कमी किंवा जास्त भरले तर?' बिरबल म्हणतो, "सोप्पं आहे! कमी भरले तर काही कावळे मरण पावले किंवा दुसऱ्या देशात उडून गेले असं समजायचं, आणि जास्त भरले तर तेवढ्या कावळ्यांचा नव्याने जन्म झालाय असं समजायचं!" आपल्या देशात जातीनिहाय जनगणनेच्या प्रश्नावर चालू असलेली चर्चा पाहिली की ही गोष्ट आठवते. देशात नेमक्या ओबीसी जाती आहेत तरी किती? या प्रश्नाबद्दल बिरबलाच्या उत्तरासारखी परिस्थिती सध्या आहे. जातवार जनगणना का करायला हवी, तिची गरज काय, आणि सरकार ती करण्यासाठी तयार का नाहीये... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न...
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.