पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांनी सध्या देशभरातल्या मीडियाचं लक्ष वेधून घेतलंय. या काळात घडलेली एक उल्लेखनीय घटना म्हणजे, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरलेले समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी, अनेक टीव्ही चॅनेल्सनी केलेल्या ओपिनियन पोल्सवर आक्षेप घेतला. ओपिनियन पोल्समुळे निवडणूक प्रक्रियेवर नकारात्मक प्रभाव पडत असून त्यामुळे निवडणुक निःपक्षपाती होऊ शकणार नाही, असे म्हणत त्यांनी ओपिनियन पोल्सवरच बंदी घालण्याची मागणी केली. त्यामुळे ओपिनियन पोल्स पुन्हा एकदा चर्चेत आलेत. 'ओपिनियन पोल्स' हा शब्द तुम्ही नेहमी ऐकत असाल पण त्याचा अर्थ काय, त्यामुळे खरंच मतदानावर प्रभाव पडतो का? त्यांची विश्वासार्हता किती? चला, ऐकूया.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.