उजाड होत चाललेली खेडी आणि तेथील माणसाचं जिकीरीचं जगणं ,हे लेखकांनी समर्थपणे मांडले आहे." पाणी "या प्रश्नाने आज अनेकांची झोप उडवली आहे . आशा वेळी धन-लांडग्यांनी गरिबांचे पाणी तोडणे , फळबाग योजनांचा मलिदा फक्त श्रीमंतानीच घेणे , रोजगार हमीत स्त्रियांची होणारी घुसमट , भूकबळी झालेल्या व्यक्तीला कागदपत्रांच्या आधाराने आजारी ठरवणे, या-ना त्या मार्गाने पैसे मिळवण्याची नशा , दोन घोट पाण्यासाठी गेलेला म्हातारीचा जीव आणि पाण्याअभावी होणारी आरोग्याची परवड आणि सर्वच क्षेत्रात होणारी ध्येयवादाची गोची , हे एकच सूत्र साधून सामान्य माणसाच्या जीवनाची परवड लेखकाने मांडली आहे.पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे मानवी संबंध कसे प्रभावित होतात याचा वेध घेणाऱ्या कथांचा संग्रह अर्थात तहानलेल्या महाराष्ट्राची कथा. लक्ष्मीकांत देशमुख लिखित मराठी कथासंग्रह - पाणी !पाणी !!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.