शिखर खुणावत असतं... पण मधे असतात अनेक अडथळे... गोठवणारी थंडी, बर्फाखाली गेलेल्या वाटा, खोल-खोल दऱ्या आणि घळी, विरळ होत जाणारा ऑक्सिजन, खड्या चढणी आणि निसरडे उतार, लहरी निसर्ग...! या सगळ्यावर मात करायला दोनच गोष्टी गिर्यारोहकाला साथ देत राहतात... एक म्हणजे उद्दिष्ट गाठायची जिद्द आणि दुसरी म्हणजे साहसी सोबती शेर्पा अर्थात गिर्यारोहणाची खरी 'लाइफ लाइन' ! बर्फातल्या वाटा मोकळ्या करणारे, घळींवर शिड्या टाकणारे, अडकलेल्या गिर्यारोहकांच्या 'रेस्क्यू'ला धावणारे, त्यांना सकस आहार मिळावा म्हणून स्वत: रांधून खाऊ घालणारे, मणामणांचं ओझं उचलून नेणारे शेर्पा ! हिमालय त्यांना जसा कळतो, तसा इतर कुणालाही कळत नाही आणि म्हणूनच ते गिर्यारोहकांचे खरे पार्थ ठरतात. हिमालयाचे हे खरेखुरे साहसवीर गिर्यारोहकांच्या यशस्वी मोहिमांमध्येही आनंद घेतात. मुख्य म्हणजे आजकाल शेर्पा इतर व्यवसायांतही मुसंडी मारत असून त्यांतही त्यांची कामगिरी उत्तुंग होत आहे. सुप्रसिद्ध आणि अनुभवी गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या पुस्तकात शेर्पांच्या या खडतर जीवनाचे विविध पैलू रंजकपणे उलगडले आहेत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.