डॉ. प्रकाश आमटे म्हणतात, "आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांचं हे स्वप्न हेमकलशात प्रत्यक्षात कसं उतरतंय, त्याची ही गोष्ट! म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट." सामाजिक कार्यासाठी 'रेमन मॅगसेसे' हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार ज्यांना देण्यात आला, त्या डॉ. प्रकाश आमटे यांनी साकार केलेल्या स्वप्नांची ही गोष्ट 'प्रकाशवाटा'मध्ये शब्दबद्ध केली आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण आबालवृद्धांना प्रेरणाही देते. ऐका, डॉ. प्रकाश आमटेलिखित 'प्रकाशवाटा' - 'सचिन खेडेकर' यांच्यासह…
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.